सासवडला किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण

सासवडला किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण

Published on

सासवड, ता. १६ : सासवड (ता. पुरंदर) येथील सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी (ता. १५) येथील पुरातन चांगावटेश्वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले. माजी आमदार संजय जगताप हे मंडळाचे अध्यक्ष असून, गेली २० वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
यावेळी इतिहास संशोधक महेंद्र नवले आणि अक्षता नवले यांनी इतिहास, मंदिर, मोडीलीपी याबाबत माहिती दिली. मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी प्रास्ताविक, प्रा. अमित पावशे यांनी स्वागत केले. ईश्वरी बोरुडे हीने प्रसंगाला अनुरूप शिवशंभू छत्रपतींचे स्मरण करणारी गारद दिली. यावेळी सुमारे पाच हजार स्पर्धकांना दरवर्षी चॉकलेट बॉक्स देणाऱ्या ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी संजय काटकर, अमित पावशे, अमित पवार, संदीप इनामके, स्वानंद लोमटे, सागर घाटगे, प्रा. मनिषा कामठे, प्रा. स्नेहा शेवाळे, दीपक जगताप, जीवन कड, अनिल गद्रे, प्रा. संदीप टिळेकर, संदीप राऊत, परशुराम देशमुख, प्रसाद जगताप आदी उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे
सासवड शहर वैयक्तिक गट : प्रथम- ओंकार गिरमे, द्वितीय- तन्मय म्हेत्रे, तृतीय- ओम झेंडे, चतुर्थ- स्वराज पवार, पाचवा- साई टिळेकर, उत्तेजनार्थ विनीत गिरमे, या सर्वांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार, ७०० आणि ५०० रुपये बक्षीस देण्यात आले.
सामुहिक गट ः प्रथम- श्री काळभैरवनाथ दुर्गसेवक मंडळ, द्वितीय- गुरुकुल करिअर अॅकॅडमी, तृतीय- शिवशंभो ग्रुप, चतुर्थ- महात्मा फुले मित्र मंडळ आणि शंभूराजे मंडळ, पाचवा- श्रीमंत नेताजी मित्र मंडळ, साईनाथ सार्वजनिक मित्र मंडळ आणि उत्तेजनार्थ- स्वराज बालमित्र मंडळ, या सर्व विजेत्यांना चषक, प्रशस्तीपत्रक आणि अनुक्रमे ११ हजार, सात हजार, पाच हजार, तीन हजार, दीड हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

06410

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com