सासवडमध्ये बुलेटस्वारांच्या ''फटाक्यां''चा उच्छाद
सासवड, ता. १८ : सासवड शहर आणि परिसरात बुलेटच्या फटाक्यांसह कर्कश आवाजाचा उच्छाद मांडणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे रुग्ण, वृद्ध आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी बेशिस्त दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा नीता सुभागडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सासवड पोलिसांना निवेदन दिले आहे.
शहरातील एसटी स्थानक, महाविद्यालय परिसर आणि सोपाननगर भागात शाळा सुटण्याच्या वेळी हे तरुण मुद्दाम आवाजाचे फटाके फोडून दहशत निर्माण करतात. अनेक दुचाकींना कायदेशीर नंबर प्लेट नसून त्यावर नावे किंवा डिझाइन्स आहेत, तर काही गाड्यांवर ''आमदार'' स्टिकर्सचा गैरवापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दर गुरुवारी पहाटे नारायणपूरकडे जाणाऱ्या टवाळखोरांमुळे ग्रामस्थ आणि जनावरांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी भिवडी ग्रामस्थांनी काही टवाळखोरांना पकडून चोप दिला होता. तसेच सासवडच्या सोपाननगर परिसरात राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा नीता सुभागडे व नागरिकांनी दोन वाहनांसह टवाळखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. रात्री उशिरा लग्न समारंभानंतर भरवस्तीत तसेच अगदी रात्री १२ नंतर होणारी फटाक्यांची आतिषबाजी थांबवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या संदर्भात नीता सुभागडे आणि कुमुदिनी पांढरे यांनी पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन दिले आहे.
सासवड पोलिस ठाण्याकडून विशेष पथके तयार केली आहेत. शाळा-महाविद्यालय, परिसरात दररोज कारवाई सुरू असून, अशा टवाळखोरांवर कडक लक्ष ठेवले जात आहे.
-कुमार कदम, पोलिस निरीक्षक, सासवड
6420
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

