सासवडच्या शिवतीर्थावर शिवरायांचा जयघोष

सासवडच्या शिवतीर्थावर शिवरायांचा जयघोष

Published on

सासवड, ता. १९ : शिवजयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थावर शिवस्मृती प्रतिष्ठान आणि सासवड नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रमांतून मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा झाला. अनेक युवक, नागरिकांनी शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.
माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, सोपान रणपिसे, राजन जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, नगरसेविका स्मिता उमेश जगताप, प्रियांका साकेत जगताप, स्मिता सुहास जगताप, लीना सौरभ वढणे, अर्चना चंद्रशेखर जगताप, शीतल प्रविण भोंडे, तसेच बाजीराव जगताप, नंदकुमार जगताप, सागर जगताप आदींनी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शिववंदना व इतर उपक्रम झाले. शिवस्मृती प्रतिष्ठानचे सदस्य, माजी नगरसेवक आणि शिवप्रेमींची उत्साही उपस्थिती होती.
दरम्यान, बुधवारी रात्रीपासूनच पुरंदर किल्ल्याचा रस्ता गजबजला होता. जिल्ह्यातील विविध गावांतील हजारो युवकांनी ज्योत आणण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर गर्दी केली होती. भगवे झेंडे लावून हजारो दुचाकी रात्रभर रस्त्यावरून फिरत होत्या. गुरुवारी दिवसभर चौकाचौकात मोठमोठाले भगवे झेंडे, ध्वनिक्षेपकावरील पोवाडे यांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. शिवतीर्थावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा, सरसेनापती बाजी पासलकर समाधीस्थळी, सरदार गोदाजीराजे जगताप, तसेच महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बुधवारी तालुक्यातील शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालयांत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com