शिवरीत स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ

शिवरीत स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ

Published on

​सासवड, ता. ७ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी (ता. पुरंदर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त मंगेश घोणे यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे, केंद्रप्रमुख सुरेखा कामथे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका तुषार कामथे, उपाध्यक्ष संतोष लिंभोरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामथे, कार्याध्यक्ष पंढरीनाथ कामथे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. कै. इंदूबाई काशिनाथ लिंभोरे यांच्या स्मरणार्थ विकास लिंभोरे यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आल्या. तालुका व जिल्हा स्तरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान केला.
लोकवर्गणीतून शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधण्यात आल्या असून ‘रूम टू रीड’ संस्थेतर्फे सुसज्ज वाचनालय उभारले आहे. स्नेहसंमेलनासाठी ग्रामस्थांनी एक लाख पाच हजारांचा निधी जमा. कै. गंगाराम गेणू लिंभोरे यांच्या स्मरणार्थ वासुदेव लिंभोरे यांनी विद्यार्थ्यांच्या ट्रॅकसूटसाठी ५० हजारांची देणगी जाहीर केली.

विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, पोवाडा, देशभक्तिपर गीते, लावणी आणि समाजप्रबोधनपर नाटिका सादर केल्या. यासाठी लहू कामथे, अंकुश कामथे, संतोष जगताप, सचिन कामथे, अजय लिंभोरे, ऋतुजा कामथे, स्वरांजली कामथे, सुवर्णा लिंभोरे, प्रियांका लिंभोरे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी महादेव माळवदकर, सुनील कुंजीर, सुनील जगताप, भाऊसाहेब बरकडे, मनोज सटाले, गणेश कामठे, कुंडलिक कुंभार, अश्‍विनी फुंदे, वर्षा जगताप, आरती सोनवणे आदी उपस्थित होते.

मेघराज कुंभार, प्रकाश जगताप, रूपाली हरिहर, निर्मला पोमण या शिक्षकांनी नियोजन केले. प्रकाश जगताप, निर्मला पोमण, रूपाली हरीहर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका श्‍वेता जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com