भरड धान्य पाककला स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांचा सहभाग
सासवड, ता. ६ : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीच्या मिलेट्स ऑफ इंडिया या विशेष उपक्रमांतर्गत सासवड (ता. पुरंदर) येथील स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा प्रशालेत भरड धान्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन आणि पाककला स्पर्धा गुरुवारी (ता. ५) झाली. आरोग्यासाठी पोषक असलेल्या तृणधान्यांचा प्रसार व्हावा आणि नवीन पिढीला त्याची चव समजावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.पदार्थांची चव, मांडणी आणि त्यातील पौष्टिक मूल्य या आधारावर परीक्षण करण्यात आले. यामध्ये प्रथम - वैष्णवी वाघे, द्वितीय - डवनेश कार, तृतीय - अनुष्का भोसले यांनी यश मिळविले. या स्पर्धेमध्ये प्रशालेतील एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राळा यांसारख्या भरड धान्यांपासून बनवलेले लाडू, थालीपीठ, उपमा, बिस्किटे, रगडापुरी, पिझ्झा, मोदक, खिचडी, ढोकळा, केक यांसारखे पदार्थ प्रदर्शनात मांडले होते. किर्लोस्करच्या समन्वयक सुवर्णा चित्राव, तुषार सरोदे, अर्जुन नाटेकर, नयन जाउंजाळ यांसह दिवे येथील कातोबा हायस्कूलच्या मोनिका कुंभार आणि सुरेखा चव्हाण यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

