सासवडमध्ये हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई
सासवड, ता. ६ : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन जाताना गुरुवारी (ता. ५) मध्यरात्री सासवड (ता. पुरंदर) परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या हवेली तालुक्यातील तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच, सासवड जवळील वनपुरीच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून हुल्लडबाजांना चोप दिला.
सासवड परिसरात गुरुवारी रात्री १२ ते पहाटे ३ च्या सुमारास सायलेन्सर काढलेल्या दुचाकींच्या कर्कश आवाजाने नागरिकांची झोप उडवली होती. सासवड पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करीत १४ दुचाकी ताब्यात घेतल्या असून, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती माहिती पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.
सासवड शहरात हा प्रकार वारंवार घडत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, संतोष जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजित पवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार आणि प्रा. केशव काकडे यांच्या शिष्टमंडळाने सासवडचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन एक वर्षासाठी रद्द करावे. सायलेन्सर बदलून देणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई व्हावी. हुल्लडबाजांना पाठीशी घालणाऱ्यांची नावे सार्वजनिक करावीत. अल्पवयीन मुलांचे प्रबोधन करून त्यांना संस्कार शिबिरात पाठवावे, अशा मागण्या केल्या.
अपुऱ्या पोलिस बळामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये कायद्याची भीती उरलेली नाही. जर या कारवाईनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर सासवडमध्ये मोठे सार्वजनिक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अभिजित जगताप आणि संतोष जगताप यांनी दिला आहे. तसेच, ‘ग्राम सुरक्षा दलांना’ विशेष अधिकार देऊन सक्रिय करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

