खळद येथील त्या परप्रांतियाचा खूनच

खळद येथील त्या परप्रांतियाचा खूनच

Published on

​सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील खळद येथील गोटेमाळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू हा अपघाती नसून, त्याचा डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खळद येथील पोलिस पाटलांकडून माहिती मिळाली होती की, शनिवारी (ता. १४ फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास गोटेमळा परिसरात एक व्यक्ती लोकांना दगड मारत आहे. सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, मोहन ढाब्याजवळ चिंचोळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दगडांच्या ढिगाऱ्यात एक ३३ वर्षीय तरुण नग्न व बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.मिश्रीलाल छोटेलाल (वय ३३, रा. छोलामऊ, उन्नाव, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. त्याला तातडीने सासवड ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालय, पुणे येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी (ता. २२ फेब्रुवारी) त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ६) मृताचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालात मयताच्या अंगावर विविध जखमा असून, मृत्यूचे मुख्य कारण ''डोक्याला झालेली गंभीर इजा'' असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्याला अज्ञात कारणावरून, जिवे मारण्याच्या उद्देशाने कोणीतरी गंभीर मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस नाईक गोकूळ मोहन हिप्परकर यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करत आहेत. सदर या घटनेबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास त्यांनी ९०११०७९६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com