बलिदान मासनिमित्त सासवडमध्ये रक्तदान शिबिर
सासवड, ता. १३ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर विभागाच्या वतीने धर्मवीर बलिदान मासनिमित्त सासवड शहरात विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रविवारी (ता. १५) भव्य रक्तदान शिबिर आणि बुधवारी (ता. १८) मूकपदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंतचा काळ ‘धर्मवीर बलिदान मास’ म्हणून पाळला जातो. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल केले, त्या स्मृती जागृत ठेवून हिंदू समाज या काळात आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करून महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो. पुरंदरमधील ५५ हून अधिक गावांत आणि शाळांमध्ये हा उपक्रम पोहोचविण्यात आला आहे.
येथील कऱ्हाबाई मंदिरात १५ मार्चला सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास किल्ले पुरंदर हा ग्रंथ आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली जाणार आहे.
मूकपदयात्रा छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी दिवशी (फाल्गुन अमावस्येला) १८ मार्चला सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थचौक ते श्री काळभैरवनाथ मंदिरापर्यंत होणार आहे. या मूकपदयात्रेमध्ये पुरंदर तालुक्यातील सर्व हिंदू समाज बांधव, भगिनी, धारकरी, वारकरी, गोरक्षक आणि शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

