भूसंपादन करून योग्य मोबदला द्या
सासवड, ता. १६ : सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी महामार्गावरील वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसावा या टप्प्यातील २९ शेतकरी कुटुंबांच्या जमिनीचे भूसंपादन आणि नुकसान भरपाईचा प्रश्न गेल्या १३ वर्षांपासून रेंगाळला आहे. हा प्रलंबित प्रश्न तत्काळ मिटावा, या मागणीसाठी शेतकरी रास्ता रोकोच्या पावित्र्यात होते. मात्र, सासवड पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार महादेव जाधव यांनी निवेदन स्वीकारले.
जमिनीचे तातडीने संपादन प्रक्रिया पूर्ण करून योग्य बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यावर तत्काळ निकाल लावावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे व सचिन राऊत म्हणाले की, ‘‘येथील २९ कुटुंबांची ७० फूट रुंद आणि सुमारे एक किलोमीटर लांब जमीन बाधित होणार आहे. सन २०१२मध्ये शासन ८ लाख रुपये प्रतिगुंठा मोबदला देत होते, तेव्हा शेतकऱ्यांनी १० लाखांची मागणी केली होती. या वादामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली. ती अद्याप कायम आहे. सन २०१७ पूर्वी हा रस्ता राज्य शासनाकडे होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे सोपवण्यात आला. सन २०२३मध्ये पुन्हा राज्य शासनाकडे वर्ग झाला. आता बांधकाम विभाग हा रस्ता नगरपरिषदेने ताब्यात घ्यावा असे म्हणत आहे. मात्र, नगरपरिषद त्यास तयार नाही. सन २०१२पासून आठ लाखांसह त्यावरील व्याजाची रक्कम किंवा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला देऊन भूसंपादन करावे आणि रस्ता पुर्ण करावा.’’
याप्रसंगी श्याम महाजन, ज्ञानेश्वर जगताप, प्रमोद बोरावके, योगेश गिरमे, स्वप्नील गिरमे, सदानंद जगताप, राजेंद्र बोरावके, दामोदर जगताप, संतोष गिरमे, प्रदीप राऊत यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक नारायण खंडागळे आणि गुप्तवार्ताचे रूपेश भगत उपस्थित होते.
प्रशासनाला रस्त्याची गरज नाही का?
सासवड येथील चंदन टेकडी ते बोरावके मळा या बाह्यवळणाचे काम अनेक दिवसांपूर्वीच पूर्ण होऊन वाहतूक सुरू झालीआहे. त्यामुळे आता या रस्त्याची प्रशासनाला एवढी गरज राहिली नाही का? त्यामुळेच आता प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
06562
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

