​सासवडमधील ग्राहकांना घरपोच मिळणार सिलिंडर

​सासवडमधील ग्राहकांना 
घरपोच मिळणार सिलिंडर
Published on

सासवड, ता. १८ : सासवडमधील (ता. पुरंदर) प्रवीण गॅस एजन्सीने ग्राहकांच्या सुविधेसाठी, गॅस केंद्रावर होणारी गर्दी आणि विस्कळीत होणारी वितरण व्यवस्था यामुळे गुरुवारपासून (ता. १९) केंद्रावरील थेट गॅस वितरण पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व ग्राहकांना केवळ ऑनलाइन बुकिंगद्वारे घरपोच सिलिंंडर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक नितीन बोरा यांनी दिली आहे. सासवड शहरात १० हजार आणि सासवडसह परिसरात सुमारे ३२ हजार गॅस ग्राहक असून, रोज सरासरी ६०० सिलिंडरची मागणी आहे. एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध असूनही ग्राहक केवळ भीतीपोटी केंद्रावर येऊन रांगा लावत आहेत. केंद्रावरील मागणी २५ टक्क्यांनी वाढल्याने वितरण प्रणालीवर ताण येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठीच आता घरपोच वितरणावर भर दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com