कऱ्हेकाठी दुमदुमला श्रीरामाचा गजर

कऱ्हेकाठी दुमदुमला श्रीरामाचा गजर
Published on

​सासवड, ता. २६ : चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमीच्या निमित्ताने गुरूवारी (ता. २६) सासवड (ता. पुरंदर) येथील कऱ्हेकाठावरील पुरातन राम मंदिरांमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सरदार पुरंदरेंच्या रामबाग वाड्यातील राम मंदिर आणि बुधकर राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सरदार जयसाहेब पुरंदरे यांच्या कऱ्हेकाठच्या राम मंदिरात परंपरेनुसार जन्मोत्सव करण्यात आला. महापूजा, अभय महाराज जगताप यांचे रामजन्मावरील प्रवचन आणि चौघड्याच्या सुरावटीत प्रभू रामाचा पाळणा गायला गेला. यानंतर आरती होऊन सुंठवडा वाटप करण्यात आला. दरम्यान, पुरंदरे कुटुंबातील जगदीश पुरंदरे, मेघा पुरंदरे यांसह अमित पवार, आनंद कोळसुने यांनी अभिषेक केला. संदीप इनामके व ओंकार निरगुडे यांनी सजावट व श्रींची पोषाख व्यवस्था केली.
सासवड येथील जगताप आळीतील बुधकर राम मंदिरात रघुनाथ खळदकर व यशदा खळदकर यांनी पहाटे पवमान अभिषेक, काकडारती, मंत्रोच्चारात सर्व धार्मिक विधी, महापूजा करण्यात आली. नामदीप भजनी मंडळानी सेवा दिल्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषात पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांना सुंठवडा, केळी आणि कैरीच्या पन्ह्याचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com