सासवडमधील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

सासवडमधील पूल वाहतुकीसाठी धोकादायक
Published on

सासवड, ता. ८ : सासवड-कोंढवा मार्गावरील सासवड (ता. पुरंदर) हद्दीतील ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने हा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.
कोंढव्याकडून सासवडकडे येताना या ठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहने वेगाने येतात. पुलापाशी रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंना १० ते १५ फूट खोल दरी आहे. रात्रीच्या वेळी परावर्तक असले तरी संरक्षक भिंत नसल्याने वाहन थेट खाली कोसळण्याची भीती आहे. दीड वर्षांपूर्वी येथे एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर दरमहा किमान एक अपघात होत असल्याचे स्थानिक शेतकरी नीलेश जगताप यांनी सांगितले. प्रशासनाने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी येथे तातडीने कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार रेळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘‘या पुलाची पाहणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना व दुरुस्तीचे काम करण्यात येईल.’’

06678

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com