

सासवड, ता. १७ : हवामान विभागाने वर्तवलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यामुळे पुरंदर तालुक्यातील ‘पुरंदर ॲग्रो एक्स्पो’च्या तारखांत बदल केला आहे. आता हे कृषी व पशू प्रदर्शन २२ ते २५ मे दरम्यान सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात संपन्न होईल, अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.
यापूर्वी हे प्रदर्शन १ ते ४ मे दरम्यान होणार होते. वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या प्रदर्शनात शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रगत यंत्रसामग्री, हरितगृह, मशरूम उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांची भव्य दालने असणार आहेत. तसेच, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, पशुपालन आणि कुक्कुटपालन या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल. राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी बी-बियाणे व खतांची माहिती देण्यासाठी उपस्थित राहतील. कोरोना काळानंतर होणाऱ्या या मोठ्या कृषी उत्सवात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.