

सासवड, ता. २३ : सासवड (ता. पुरंदर) येथे जिल्हा बँकेच्या शाखेसमोर दुचाकीस्वारांनी एका शेतकऱ्याच्या हातातील एक लाख ४४ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी जबरीने हिसकावून नेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन चंद्रकांत मेमाणे (वय ५०, रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) हे गुरुवारी (ता. २२) दुपारी पावणेएकच्या सुमारास सासवड येथील जिल्हा बँकेतून पैसे काढून जात असताना समोरील नोबेल सिटी स्कॅन सेंटरसमोर ते आले. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी मेमाणे यांच्या उजव्या हातातील पिवळ्या रंगाची कापडी पिशवी, ज्यामध्ये एकूण एक लाख ४४ हजार रुपये होते, ती जबरीने ओढली आणि वेगाने पसार झाले. या प्रकरणी मोहन मेमाणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.