

सासवड, ता. २७ : सासवड नगरपरिषदेने सोमवारी (ता. २७) विशेष मोहिमेद्वारे पालिकेसमोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगतच्या महामार्गावरील अनधिकृत हातगाड्या व अनधिकृत फलकांवर कडक कारवाई केली. यामुळे शिवतीर्थ चौक परिसरातील वाहतूक कोंडी सुटून हा परिसर मोकळा झाला आहे.
शहरातील अतिक्रणाबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनीही निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. पालिकेच्या इमारतीसमोरच ‘फ्लेक्स बंदी’चे फलक असतानाही तिथे अनधिकृत विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले होते. याची दखल घेत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. सोमवारी सकाळपासूनच पालिकेसमोर दुतर्फा उभे राहणारे फळविक्रेते आणि अनधिकृत फ्लेक्स हटवण्यात आले. या कारवाईमुळे शिवतीर्थ परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी विशेष पथके नेमली आहेत. पोलिसांकडे होमगार्डची मागणी केली असून, अपेक्षित सहकार्यासाठी प्रयत्नशील आहोत. जप्तीची आणि दंडात्मक कारवाई करत आहे. शहराचे सौंदर्य आणि रहदारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमची मोहीम यापुढेही सुरू राहील.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी
06758
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.