भिजण्याच्या मोहापायी मुकले जिवाला

भिजण्याच्या मोहापायी मुकले जिवाला

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २ : पाण्याखाली भिजण्याच्या मोहापायी मार्च ते मे २०२४ या तीन महिन्यांत १७ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर जूनअखेर हडपसरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा लोणावळ्यात पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे चार महिन्यांत मृतांची संख्या २२ वर गेली आहे.
मावळ तालुका पर्यटकांचे आवडते ठिकाण असून अनेक पर्यटक वर्षभर येतात. विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांची पावले लोणावळा, खंडाळा, तसेच पवना, वडिवळे व आंद्रा धरणांकडे वळतात. या ठिकाणी पोहण्याचा व पाण्यात भिजण्याच्या मनसोक्त आनंद घेतात. मात्र काही पर्यटकांना पोहता येत नाही, काहींना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही, अशा विविध कारणांमुळे मार्च ते जून २०२४ या चार महिन्यांत पाण्यात बुडून २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

येथे होते पर्यटकांची गर्दी :
राजमाची पॉइंट खंडाळा, घुबड तलाव, कुणेनामा, कुरवंडे, लोणावळ्यातील भुशी डॅम, टाटा धरण, तुंगार्ली धरण, पवना धरण, वडिवळे धरण, आंद्रा धरण, कुंडमळा, कासारसाई धरण, तसेच आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ येथील धबधबे.

ही ठिकाणे धोकादायक :
शेलारवाडी जवळील कुंडमळा, कासारसाई धरण, जाधववाडी धरण, पवना नदीसह आदी ठिकाणी पाण्यात बुडून चार महिन्यांत २२ जणांचे मृत्यू झाले.

‘‘लोणावळा, खंडाळासह विविध धरणांकडे येणाऱ्या पर्यटकांनी वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. अनोळखी ठिकाणी जाऊन आपला व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. योग्य काळजी घ्यावी.’’
- सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलिस अधिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.