हुतात्मा विष्णू पिंगळे यांचे स्मारक प्रेरणादायी

हुतात्मा विष्णू पिंगळे यांचे स्मारक प्रेरणादायी
Published on: 

तळेगाव ढमढेरे, ता.८ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक ग्रामस्थ व तरुणांना प्रेरणादायी ठरले आहे. येथील मुख्य रस्त्याच्या कडेला प्रशस्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक तरुणांसाठी दिशादर्शक आहे. क्रांतिरत्न पिंगळे यांचा जन्म दोन जानेवारी १८८९ रोजी झाले.. त्यांना इंग्रजांनी १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशी देण्यात आली. क्रांती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

पिंगळे यांच्या स्मारक विकास, स्मारकातील विविध सुविधा तसेच सुशोभीकरणासाठी आतापर्यंत प्रशासनातर्फे तसेच माजी केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार विकास निधी दिला आहे. निधी मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुधीर बाळसराफ यांनी पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात वर्षभर विविध संघटना व ग्रामस्थांतर्फे तसेच शालेय विद्यार्थ्यांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नऊ ऑगस्ट क्रांतिदिन, स्वातंत्र्य दिन, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती व पुण्यतिथी, प्रजासत्ताक दिन आदी विविध कार्यक्रमात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन केले जाते.
दरम्यान, या स्मारकाच्या विकासासाठी व सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायततर्फे आमदार अशोक पवार यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला असल्याचे सरपंच अंकिता भुजबळ यांनी सांगितले.


स्मारकातील उपलब्ध सुविधा
* अभ्यासिका व वाचनालय इमारत
* व्यायामशाळा इमारत,
* मुख्य प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ता,
* बोरवेलचा विद्युत पंप,
* अंडरग्राउंड विजेची केबल व विजेचे खांब
* उत्तरेकडे तारेचे कंपाउंड, दक्षिण व पश्चिम बाजूला वॉल कंपाउंड
* स्मारकाभोवती रेलिंग व लोखंडी गेट, स्मारकाभोवती फरशी
* स्मारक परिसरात आकर्षक रिंग -सर्कल, झाडांभोवती ओटे,
* ओपन जिम साहित्य, मुलांची खेळणी, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा

05035, 60144

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.