तळेगाव ढमढेरेतील
आठवडी बाजार बंद

तळेगाव ढमढेरेतील आठवडी बाजार बंद

तळेगाव ढमढेरे, ता. ११ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक सोमवारी (ता. १३) होत असल्याने तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सोमवारी भरणारा आठवडी बाजार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असून, सर्व ग्राहक, विक्रेते व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी केले. याच दिवशी सोमवारी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारही बंद राहणार असल्याचे प्रशासकांनी जाहीर केले. त्यानुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिरूरमधील मुख्य बाजार, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप व पाबळ येथील भाजीपाला, तरकारी, भुसार, कांदा बाजार, शेळी-मेंढी बाजार बंद राहणार आहे. सर्व व्यापारी, अडतदार, शेतकरी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक अरुण साकोरे, सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com