

तळेगाव ढमढेरे : येथील कवठीचा मळा परिसरात भरदिवसा रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने मंगळवारी तातडीने वनपाल गौरी हिंगणे, संदीप ढमढेरे, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, शुभम वाघ, शुभम शिस्तार, ऋषिकेश विधाटे आदींनी भेट देऊन बिबट्याच्या वावराविषयी माहिती घेतली.
येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन वनपाल गौरी हिंगणे यांनी दिल्याचे संदीप ढमढेरे यांनी सांगितले.
दरम्यान, तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळुंगी आदी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून येथेही वन विभागाने पाहणी करून पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.