टाकळी भीमा येथे बिबट्या जेरबंद

टाकळी भीमा येथे बिबट्या जेरबंद

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.३ : टाकळी भीमा (ता.शिरूर) येथे बुधवारी (ता.३) सायंकाळी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. काही दिवसांपासून टाकळी परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.
रमेश रोहिदास साकोरे यांच्या शेतामध्ये वन विभागाने मंगळवारी (ता.२) पिंजरा लावला आणि एकाच दिवसात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. असे असले तरी आणखी दोन बिबटे परिसरात फिरत असून त्यांचाही बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी पोलिस पाटील प्रकाश करपे व ग्रामस्थांनी केली आहे.
पिंजरा लावण्यासाठी माजी उपसरपंच अश्विनी पाटोळे, विशाल पाटोळे, संतोष वडघुले, दिनेश वडघुले, रवींद्र माहुलकर, अमोल वडघुले, सागर पटणे व ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.


06188

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.