शिरूरला चासकमानचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

शिरूरला चासकमानचे पाणी 
सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. २४ : शिरूर तालुक्याला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्याला हेड टू टेल पर्यंत कालव्यातून व वेळ नदीत पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे.
शिरूर तालुक्यात पाऊस कमी झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या रब्बी पिके जोमात आली असून, या पिकांना पाण्याची गरज आहे. विशेषतः ज्वारी पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. तालुक्याला मुख्य कालव्यातून पाणी सोडल्यास कालव्याच्या कडेच्या गावांना व पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना फायदा होणार आहे. कोंढापुरी, रांजणगाव गणपती, करंजावणे, इंगळेनगर, भांबर्डे, दहिवडी पुढे टेल पर्यंत कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत. तसेच चासकमानचे पाणी वेळनदीत सोडल्यास शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे गावातील शेतकऱ्यांना व पाणी योजनांना फायदा होणार आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन चासकमानचे पाणी शिरूर तालुक्यासाठी त्वरित सोडावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व विविध गावचे सरपंच करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com