अशोक पवार यांचा आज आभार मेळावा

अशोक पवार यांचा
आज आभार मेळावा
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ३ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गीताई विष्णू मंगल कार्यालयात बुधवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी आभार मेळाव्याचे आयोजन केले आहे. ‘‘शिरूर- हवेली मतदारसंघातील मतदारांनी अशोक पवार यांना खंबीरपणे साथ दिली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी अपार कष्ट केले. त्यांचे आभार मानण्यासाठी आभार मेळाव्यानिमित्त सदिच्छा भेट होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे,’’ असे आवाहन माजी आमदार ॲड. अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्‍वास ढमढेरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com