तळेगावातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण

तळेगावातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ११ : ‘‘समाजसुधारकांचे विचार आजही जगाला दिशा देणारे ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजही राज्यकर्त्यांना व समाजाला नितांत गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात समाजसुधारकांची माहिती सखोल व सविस्तर असावी. थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. महात्मा फुले यांनी राबविलेला समतेचा विचार आजही समाजाला प्रेरणादायी ठरला आहे. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर आपला देश अखंडित असून नवीन पिढीने समाजसुधारकांचे विचार आचरणात आणावेत,’’ असे मत माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिरूर बाजार समितीच्या महात्मा फुले उप बाजारातील प्रांगणात महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अशोक पवार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, ग्रामपंचायत, बाजार समिती, विविध शाळा, विविध संघटना व ग्रामस्थांतर्फे येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे व ॲड. यशवंत ढमढेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, बाळासाहेब लांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भुजबळ, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उद्योजक संजय नरके, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन नरके, विमा सल्लागार अनिल कापरे, उद्योजक सचिन लांडे पाटील, शिक्रापूर ग्रामपंचायतचे सदस्य त्रिनयन कळमकर, युवा उद्योजक किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विलास खुर्पे, राजेंद्र केदारी, लक्ष्मण नरके, उमेश भुजबळ, तसेच माजी सरपंच विद्या भुजबळ, बाळासाहेब भुजबळ व संभाजी भुजबळ, उपसरपंच स्वाती लांडे, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, मच्छिंद्र भुजबळ, अर्जुन तोडकर, महेंद्र पिंगळे, सुखदेव भुजबळ, बापू कुदळे, ॲड. संपत ढमढेरे, मनोज अल्हाट, मोहन भुजबळ, माऊली अल्हाट, सुदाम भुजबळ, सचिव अनिल भुजबळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com