तळेगाव ढमढेरेचे दोन गटात विभाजन रद्द

तळेगाव ढमढेरेचे दोन गटात विभाजन रद्द

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.१२: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस हा जिल्हा परिषद गट व गण पूर्वीप्रमाणेच म्हणजेच २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच कायम ठेवावा अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली असून, त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून तळेगाव ढमढेरे गावाचे नवीन प्रभाग रचनेनुसार दोन जिल्हा परिषद गटात विभाजन रद्द करण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणेच गट व गण रचना ठेवण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्तांनी कळविले आहे.

नवीन प्रारूप आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे गावाची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी करण्यात आली होती. यामध्ये प्रभाग क्रमांक एक हा सणसवाडी जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आला होता तसेच प्रभाग क्रमांक दोन ते सहा हे शिक्रापूर जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आले होते. गावची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नवीन प्रारूप आराखड्यावर आक्षेप घेतले होते. त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून व एक दिवस गाव बंद ठेवून आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांतर्फे हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. हरकतींची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे ६ ऑगस्ट रोजी झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार व हरकतीचा विचार करून विभागीय आयुक्तांनी तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस हा जिल्हा परिषद गट पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे गावाचे विभाजन दोन निवडणूक विभागात होत असल्याने हरकतदारांची हरकत मान्य केल्यास १५- न्हावरा, १७- पाबळ, १८ - शिक्रापूर, १९- तळेगाव ढमढेरे, २०- मांडवगण फराटा या निवडणूक विभागात वरील प्रमाणे बदल होऊन सन २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. अखेर ग्रामस्थांच्या मागणीला व हरकतीला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवल्याने तळेगाव ढमढेरे गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार व हरकतीनुसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट व गण कायम राहिला असून आता निवडणुकीसाठी इच्छुकही पुढे सरसावले आहेत. आरक्षण कोणतेही येऊ दे त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहे.

अशी आहे लोकसंख्या
तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गणात - तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, धानोरे, दरेकरवाडी व टाकळी भीमा ही गावे समाविष्ट असून त्यांची एकूण लोकसंख्या २६१४८ इतकी आहे. आणि रांजणगाव सांडस पंचायत समिती गणात - रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, अरणगाव, करंजावणे, निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, भांबर्डे व उरळगाव एकूण लोकसंख्या २३१६१ समाविष्ट आहे. एकूण जिल्हा परिषद गटाची निवडणूक लोकसंख्या ४९३०९ इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com