युवकांनी समाजाभिमुख कर्तव्य बजावावे
तळेगाव ढमढेरे, ता.२६ : आगामी काळात छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशी बांधील असलेल्या युवकांना राजकारणात संधी व राजकीय बळ देणार आहे. युवकांनी समाजाभिमुख कर्तव्य बजावल्यास सर्वसामान्य जनता पाठीशी असते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार व पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. शेतकरी, महिला, युवक, बेरोजगार, कामगार आदींचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मदत करावी, विधायक उपक्रमास प्राधान्य द्यावे, दहीहंडीचा समाजाभिमुख उपक्रम राबवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे राहुल करपे सोशल फाउंडेशन व मित्रमंडळींतर्फे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिरूर-हवेलीचे माजी आमदार ॲड.अशोक पवार होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, आनंदराव हरगुडे, मीना सातव, शांताराम कटके, डॉ. एल. के. कदम, सोमनाथ भुजबळ, संजय जगताप, हनुमंत काळे, बाळासाहेब ढमढेरे, विद्या भुजबळ, रमेश भुजबळ, शिवाजी वडघुले, राजेंद्र जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नृत्यांगना हिंदवी पाटील व अभिनेत्री गायत्री दातार यांचा मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
दहीहंडी फोडण्यासाठी दहा मंडळांनी सहभाग घेतला. योगीराज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल करपे यांनी स्वागत केले. तर आकाश वडघुले यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, पिंपळगाव (ता. दौंड) येथील खलनायक साम्राज्य मोरया प्रतिष्ठान मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. प्रथम क्रमांकाच्या दहीहंडीसाठी ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस व आकर्षक स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.