घोडनदी वकील संघटनेचा मराठा आंदोलनास पाठिंबा
तळेगाव ढमढेरे, ता.३१: मराठा आरक्षणाबाबत मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास घोडनदी वकील संघटनेने पाठिंबा दिला असून, पाठिंब्याचे पत्र मुंबई येथे वकिलांच्या प्रतिनिधींनी रविवारी (ता.३१) दिले. संघटनेच्या वतीने आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांसाठी पाणी बॉक्स, बिस्किटे आणि अन्य आवश्यक साहित्य व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
यावेळी घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. उदय सरोदे, माजी अध्यक्ष अँड. सुहास ढमढेरे, ॲड. निवृत्ती वाखारे, ॲड. वीरेंद्र सावंत, ॲड. सागर जठार व इतर वकील बांधवांनी आझाद मैदानावर उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

