शिरूर शिक्षक पतसंस्थेचे दोन संचालक अपात्रच

शिरूर शिक्षक पतसंस्थेचे दोन संचालक अपात्रच

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. १ : थकबाकी व मासिक सभांना गैरहजर राहिल्याचे चौकशीवरून सिद्ध झाल्याने शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक बबन म्हाळसकर व नंदकिशोर पडवळ या दोघांचे संचालकपद रद्द करावे, असे सहाय्यक निबंधक यांच्या आदेशावर विभागीय सहनिबंधक यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
या दोघांचे संचालकपद रद्द करावे, अशी मागणी पतसंस्थेचे सभासद शंकर शिंदे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूरचे अरुण साकोरे यांच्या कार्यालयाकडे केली होती. चौकशीनंतर सहाय्यक निबंधक यांनी १० जानेवारीच्या आदेशानुसार दोन्ही संचालकांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केला होता. त्यावर दोन्ही संचालकांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग योगीराज सुर्वे यांच्याकडे पुनर्ननिरीक्षण कार्यालयाकडे याचिका दाखल करत तक्रारदार सभासद शिंदे यांच्यावरच थकबाकीदार असल्याचा आरोप केला होता. याबाबत मागील आठ महिन्यात अनेक सुनावणी झाल्या. विभागीय सहनिबंधक यांनी अर्जदार आणि प्रतिवादी यांना आपापले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली. सर्व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पुणे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीच्या लेखापरीक्षण अहवालात व संस्थेने दाखल केलेल्या म्हणण्यानुसार अर्जदार थकबाकीदार असल्याचे सिद्ध होते. तसेच, याचिकाकर्ते दोन्ही संचालक ३१ मार्चअखेर थकबाकीदार असून, दोघेही तीनपेक्षा अधिक मासिक सभांना पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तरतुदीनुसार ते अपात्रता धारण करीत असल्याने सहाय्यक निबंधक यांचा आदेश कायम ठेवत अर्ज अमान्य केला. या निर्णयामुळे पडवळ आणि म्हाळसकर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरले आहेत.

संस्थेच्या ९५ वर्षाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडत असून, तक्रारदारावर आरोप केल्याचे कागदपत्रावरून सिद्ध झाल्याने विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे सहकारी संस्थेतील अपप्रवृत्तींना आळा बसणार असून, संचालक मंडळ आपली कर्तव्य आणि जबाबदारीकडे अधिक लक्ष देतील, असा विश्वास वाटतो.
- शंकर शिंदे, तक्रारदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com