तळेगावात २० एकर उसाला आग
तळेगाव ढमढेरे, ता.२६: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता.२६) दुपारच्या सुमारास न्हावी रस्त्यालगत असलेल्या उसाला अचानक आग लागली. यामुळे शेजारील सुमारे २० एकर ऊस आगीत जळाला आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
आग लागताच शेताच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी जळालेल्या उसाकडे धावले. मात्र, तोपर्यंत शेजारच्या बहुतांश उसात आग पसरली होती. शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. विजय ढमढेरे, नवनाथ ढमढेरे, अविनाश ढमढेरे, सतीश ढमढेरे, संतोष ढमढेरे, तात्या ढमढेरे, राजेंद्र ढमढेरे, ओंकार ढमढेरे, किसन ढमढेरे, सुभाष ढमढेरे या शेतकऱ्यांनी आग शमविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आग आटोक्यात आणल्यामुळे शेजारील सुमारे ८० ते ९० एकर ऊस आगीतून वाचला आहे.
शेतकरी शहाजी ढमढेरे, योगेश माळी, नवनाथ ढमढेरे, दत्तात्रेय ढमढेरे, गणेश ढमढेरे, विजय ढमढेरे, सचिन ढमढेरे, अविनाश ढमढेरे, चिंतामण ढमढेरे या शेतकऱ्यांचा सुमारे २० एकर शेतातील उभा ऊस आगीत जळाला आहे.
कृषी सहाय्यक, तलाठी व महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी ऊस जळाल्याची कल्पना दिली. आगीत जळालेल्या उसाचा पंचनामा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, आगीत जळालेला ऊस तातडीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नेणार असल्याचे सोसायटीचे संचालक विजय ढमढेरे व खरेदी-विक्री संघाचे संचालक नवनाथ ढमढेरे यांनी सांगितले.
08401
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

