कोंढापुरी येथे विविध स्पर्धा
तळेगाव ढमढेरे, ता. २३ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन कले होते. स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्यातर्फे रोख बक्षीसे देऊन जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर माहिती सांगून वेशभूषा सादर केली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक धनंजय गायकवाड, नानासाहेब गायकवाड, उपसरपंच सुषमा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, माजी सरपंच नंदा ढसाळ, पोलिस पाटील राजेश गायकवाड, महेंद्र वीर, अतुल ढसाळ, भाग्येश गायकवाड, संतोष दिघे, विक्रम गायकवाड, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, वैभव गायकवाड, वर्षा गायकवाड, प्रियांका माने, सोनाली गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
08738
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

