तळेगावात शेळ्या मेंढ्यांची विक्रमी आवक
तळेगाव ढमढेरे, ता. ३ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.२) सुमारे २७०० शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्रमी आवक झाली.
बाजारात होळी व धुलिवंदन तसेच परिसरातील यात्रा-जत्रांमुळे शेळी, बोकड व मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली. मागणीच्या प्रमाणात मेंढपाळ, शेतकरी व पशुपालकांनी येथील बाजारात शेळी, बोकड व मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात आवक केली आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले व साहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितली.
शेळी व बोकडाला सुमारे ८००० हजार ते २१००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. मेंढीला ४००० हजार ते ९००० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथील बाजारात शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, हवेली, दौंड, आंबेगाव, जुन्नर व खेड आदी परिसरातील पशुपालकांनी शेळी, बोकड व मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. तसेच येथील बाजारात मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सातारा, अलिबाग, पनवेल, सोलापूर या ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी आले होते.
बाजाराच्या गर्दीमुळे बाजार समितीतर्फे पशुपालक व खरेदीदारांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रशस्त जागा व पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
08762
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

