तलाव कोरडा पडल्याने कासारीत तीव्र पाणीटंचाई

तलाव कोरडा पडल्याने कासारीत तीव्र पाणीटंचाई

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.३ : कासारी (ता. शिरूर) येथील तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तलावात चासकमानचे पाणी त्वरित सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील शासकीय तलाव १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आला आहे. हा तलाव गावाला वरदान ठरला आहे. चासकमानच्या पाण्याने भरल्यास पाणीटंचाई कमी होते. येथील तलावाच्या शेजारी गावची पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. येथूनच ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या या तलावात पाणी नसल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असून, पाणीटंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथील तलावाच्या पाण्याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी होतो. येथील तलावात चासकमान धरणाचे पाणी सोडल्यास किमान दीड ते दोन महिने पाणीटंचाई दूर होते. येथील शासकीय तलावात चासकमानचे पाणी त्वरित सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


08767

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com