पांढऱ्या दिव्यांची फॅशन ठरतेय जीवघेणी
तळेगाव ढमढेरे, ता. ६ : अलीकडील काळात वाहनांच्या अतिरिक्त संख्येमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची रहदारी वाढली आहे. वाहन कायद्यानुसार नवीन गाडी घेताना मूळ दिवे बदलून काहीजण प्रखर पांढरे प्रकाशाचे दिवे व कर्कश आवाजाचा हॉर्न बसवतात. काही वाहनचालक फॅशनच्या नादात नियमांची पायमल्ली करून पांढरे प्रकाशाचे दिवे वाहनांना बसवतात. परंतु, हे प्रखर प्रकाश देणाऱ्या दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी पुढील वाहन चालकांना डोकेदुखी ठरत असून, समोरून येणारे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. वाहनावरील अशा फॅशनवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करून अशा फॅशनला वेळीच प्रतिबंध करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सध्या शहर, उपनगर व ग्रामीण भागात वाहनांवर तीव्र पांढरे एलईडी दिवे बसवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या दिव्यांचा त्रास अधिक जाणवतो. हे दिवे अपघातांना आमंत्रण देत असल्याचे अनेक वाहनचालक सांगत आहेत. या प्रखर दिव्यांमुळे अपघातही होत आहेत. वाहतूक नियमांनुसार वाहनांमध्ये ठराविक क्षमतेचे आणि मान्यताप्राप्त दिवेच वापरणे बंधनकारक आहे. तरीदेखील काही वाहनचालक नियमांची उघडपणे पायमल्ली करीत असल्याचे दिसते.
तसेच, बुलेट दुचाकी व मोठ्या वाहनावरील हॉर्नचा कर्कश आवाज ही एक आधुनिक युवक व वाहन चालकांची फॅशन झाली आहे. कर्कश आवाजाचा सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या कानाला त्रास जाणवतो. कर्कश आवाजामुळे अनेकांचे कान बधिर होतात. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांंकडून केली जात आहे.
वाहन चालकांनी नियमानुसार जे मूळ दिवे दिले आहेत, तेच वाहनांना वापरावेत. तसेच, कर्ण कर्कश हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर तसेच, काळ्या काचा वापरणाऱ्या वाहन चालकांवर शिक्रापूर पोलिस कायदेशीर कारवाई करतील. रस्त्यावर असे बेकायदेशीर कृत्य वाहनचालकाने केल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल.
- दीपरतन गायकवाड, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर
08783
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

