तळेगाव ढमढेरे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
तळेगाव ढमढेरे, ता. ९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य विकास वृद्धिंगत होण्यासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी १५ दिवस जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सीए प्रसाद बजाज व सीए शंकर भागरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जीएसटी करप्रणाली संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले, तर सीए दीपक सोनवणे यांनी वाणिज्य शाखेतील करिअर संधी, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य पराग चौधरी, प्रा. अश्विनी पवार, प्रा. प्रीती पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. नीलेश पाचुंदकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले, तर प्रा. अविनाश नवले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

