निमगाव संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन नागवडे बिनविरोध

निमगाव संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन नागवडे बिनविरोध
Published on

तळेगाव ढमढेरे, ता.११: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन नागवडे व उपाध्यक्षपदी रोहिदास रणसिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष शुभांगी चव्हाण व उपाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ, सचिव ज्योती घोरपडे यांनी कामकाज पाहिले.
नागवडे व रणसिंग यांचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
यावेळी अनिल तागड, जयराम चव्हाण, दादाभाऊ काळे, बाबासाहेब रणसिंग, भगवान चव्हाण, गहीना चौधरी, विठ्ठल पवार, अक्षय लांडगे, विशाल नागवडे, जयश्री रणसिंग व शुभांगी चव्हाण हे संचालक उपस्थित होते.
08808, 08809

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com