शिक्रापूर- तळेगाव रस्त्यावर वाहनचालकांची गैरसोय
तळेगाव ढमढेरे, ता. १७ : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे- न्हावरा या महामार्गाचे काम चालू असून, सध्या तरी हा रस्ता सर्वांनाच गैरसोयीचा वाटत आहे.
तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर येथील काम गेली तीन महिन्यांपासून चालू असून, सर्व रस्ता खोदल्याने ओबडधोबड व खड्डेमय झाला आहे. परंतु, खोदलेल्या रस्त्यावरून वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दुचाकी व चारचाकी वाहनधारक या सर्वांनाच ये- जा करणे त्रासदायक ठरत आहे. रस्ता खोदल्याने सर्वच रस्ता चढ-उताराचा झाला आहे. मुरळ ओढा ते तळेगाव ढमढेरे या दरम्यानच्या रस्त्यावर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठेकेदाराने व प्रशासनाने खोदलेल्या रस्त्याचे त्वरित सपाटीकरण करून नागरिकांचे होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून होत आहे.
08825
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

