कासारीतील पाझर तलावात ‘चासकमान’चे पाणी सोडा
तळेगाव ढमढेरे, ता.१७ : कासारी (ता. शिरूर) येथील शासकीय तलाव व वसुमळा येथील पाझर तलावात चासकमान धरणाचे पाणी त्वरित सोडून पाणी टंचाई कमी करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथील ‘चासकमान’चे अधिकारी प्रज्ञा जगताप यांना कासारी येथे चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे मंगळवारी (ता.१७) करण्यात आली.
पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे यांनी जगताप यांना निवेदन दिले. यावेळी प्रगतशील शेतकरी संतोष काकडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सातपुते, युवराज मांढरे, विजय लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कासारी येथे चारी क्रमांक १२ व १३ मधून चासकमानचे पाणी शासकीय तलाव आणि वसूमळा येथील पाझर तलावात त्वरित सोडावे. चासकमानच्या पाण्यावर ग्रामस्थांना पाणीपुरवठा अवलंबून आहे. येथील दोन्ही तलाव कोरडे ठणठणीत पडल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तलावात चासकमानचे पाणी त्वरित सोडावे अन्यत: ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागेल असे ग्रामपंचायतचे प्रशासक व्ही. एम. पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
08827

