शिरूर हस्ताक्षर स्पर्धेत
२१ विद्यार्थ्यांना जेतेपद

शिरूर हस्ताक्षर स्पर्धेत २१ विद्यार्थ्यांना जेतेपद

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. २२ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरूर शाखेच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल येथील शिक्षक भवनामध्ये झालेल्या सभेत जाहीर करण्यात आला. शालेय पातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या २८६ पैकी २१ विद्यार्थी अंतिम विजेते म्हणून घोषित करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर, कार्याध्यक्ष संजीव मांढरे, प्रसिद्ध लेखक सचिन बेंडभर, मनोहर परदेशी व कुंडलिक कदम, मुख्य कार्यवाह विवेकानंद फंड, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उत्तम भोंडवे, युवा कवी आकाश भोरडे आदी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील पहिली ते सातवीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वाचाल तर वाचाल आणि माझा महाराष्ट्र या विषयांवर ही स्पर्धा झाली. दरम्यान, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम, बक्षिस आणि स्मृतिचिन्ह हे बक्षिस देण्यात येणार आहे. लवकरच बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याचे अध्यक्ष राहुल चातुर व कार्याध्यक्ष संजीव मांढरे यांनी सांगितले.

अंतिम विजेते विद्यार्थी (कंसात शाळा) :
शिवन्या जठार (कुलवस्ती-निर्वी), मानसी तेलंगे (इचकेवाडी-कवठे येमाई), उत्कर्षा गायकवाड (पाचवड-केंदूर), अभय राठोड (कोयाळी पुनर्वसन), पार्थ निकम (वाबळेवाडी), अधिरा शेळके (शेळके वस्ती-रांजणगाव गणपती), पूर्वा पावसे (निमगाव भोगी), शौर्य कळसकर (कळसकरवाडी-तांदळी), स्वराज गरुड (गुरवमळा-तळेगाव ढमढेरे), तेजस्विनी चिकटे (रांजणगाव), आरोही गांधले (गांधले मळा-इनामगाव), समीक्षा गायकवाड (तांदळी), गार्गी नागवडे (बाभुळसर बुद्रुक), आरोही कुदळे (तळेगाव ढमढेरे), तेजस्विनी शितोळे (पिंपरखेड), कीर्ती झावरे (कोयाळी पुनर्वसन), श्रेया मैंद (करंजावणे), स्वरूपा शेळके (करंदी), आदिती झगडे (कोयाळी पुनर्वसन), गौरी गायकवाड (शिक्रापूर), ईश्वरी धुमाळ (पिंपळे खालसा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com