तळेगाव ढमढेरेत गॅस वितरण विस्कळित

तळेगाव ढमढेरेत गॅस वितरण विस्कळित

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. २२ : येथील एचपी घरगुती गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने ग्राहकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी (ता. २१) कडक उन्हात रांगा लावूनही सिलिंडरचे वाहन न आल्याने संतप्त ग्राहकांनी प्रशासकीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे रविवारी नेहमीप्रमाणे गॅस सिलिंडर मिळेल या आशेने ग्राहकांनी सकाळपासूनच रस्त्याच्या कडेला सिलिंडरच्या रांगा लावल्या होत्या. मात्र, गॅस एजन्सीकडून वितरणाबाबत कोणताही पूर्वसूचना देण्यात आला नाही. उशिरा संदेश मिळाल्याने ताटकळत उभ्या असलेल्या ग्राहकांना रिकाम्या सिलिंडरसह घरी परतावे लागले. एजन्सीच्या या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कासारी गावातही नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वितरणाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २३) गॅस वितरण होईल, असे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com