

टाकळी हाजी, ता. २१ : म्हसे बुद्रुक (ता. शिरूर) व म्हसे खुर्द (ता. पारनेर) परिसरात पिके तसेच सुकून गेली आहेत. कुकडी नदीला पाणी न पोचल्यामुळे ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. ‘इतर सर्वांना पाणी मिळाले मग आम्हावर अन्याय का?’ असा सवाल व्यक्त केला जात आहे .
मळगंगा देवी यात्रे दरम्यान नदीला पिण्यासाठी धरणातून थेट नदीला पाणी सोडले होते. हे पाणी बंधारे भरत भरत खाली येत होते. ते टाकळी हाजी, गाडीलगाव बंधाऱ्यापर्यंत पोचले. ‘पाणी आज येईल, उद्या येईल’ या आशेवर ग्रामस्थ चातकासारखे वाट पाहात होते. मात्र शेवटी पाणी शिनगरवाडी, म्हसे बंधाऱ्यापर्यंत आलेच नाही. अनेक ठिकाणचे बंधाऱ्यांचे ढापे पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जात काढले. मात्र पाण्याचा दाब कमी होता. त्यासाठी वीजही बंद केली होती. यामुळे पाणी म्हसे गावापर्यंत पोचलेच नाही.
बंधाऱ्यामधून म्हसे खुर्द व म्हसे बुद्रुक या दोन्ही गावचे सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येते. पाणी न आल्यामुळे दोन्ही गावचे ऊस व चारा पिके सुकून चालले आहे. त्यांचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. पशुपालकांवर चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नदीला त्वरित पाणी सोडण्यात यावे व बंधारे भरून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अनेक वेळा मागणी करूनही म्हसे गावापर्यंत पाणी न पोहचल्याने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटबंधारे खात्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने पाणी पोचले नाही. आता तरी कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर म्हसे बंधारा प्राधान्याने भरून देण्यात यावा.
- सोनभाऊ मुसळे, म्हसे खुर्द
00171
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.