टाकळी हाजी परिसरात पुन्हा रोहित्रांची चोरी

टाकळी हाजी परिसरात पुन्हा रोहित्रांची चोरी

टाकळी हाजी, ता. ८ : रोहित्रे चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नसून पुन्हा टाकळी हाजी परिसरातून तीन रोहित्रांवर चोरांनी डल्ला मारला आहे. पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत का, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला आहे.

विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री साबळेवाडी परिसरातील दोन तसेच शिंदेवाडी येथील एक भाषेतील रोहित्र चोरीला गेले. चार दिवसांपूर्वी निमगाव दुडे येथील तीन रोहित्र चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरांनी नव्याने एकाच वेळेस तीन रोहित्रांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून देण्याचे मोठे आवाहन वीज मंडळावर आले आहे.

एखादा रोहित्र जळाला की दुसरा दुरुस्त केलेले रोहित्र तेथे बसविला जातो. मात्र, रोहित्रच चोरी गेले तर तेथे नवीन रोहित्र उपलब्ध करून द्यावे लागते. त्यासाठी आर्थिक तरतूदही करावी लागते. त्यामुळे यामधे वेळ जात असल्याने शेतकऱ्यांना रोहित्र देताना वेळ लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात साडेतीनशेच्या वर रोहित्रांची चोरी झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांनी दिली. टाकळी हाजीचा परिसर नदीकाठचा असून अनेक रोहित्र वस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे चोरांना चोरी सहजपणे करता येते. याबाबत वेळोवेळी पोलिसांकडे मागणी करूनही रोहित्र चोर गजाआड करण्यात यश येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


आंदोलनाचा इशारा
ऐन खरीपाच्या तोंडावर रोहित्रांच्या चोऱ्या होत असून, याबाबत पोलिस खाते बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे पोलिसांचा कोणताही अवैध धंद्यावर लगाम राहिला नसल्याचे नागरिक असुरक्षित झाली आहे. पोलिस खात्याने रोहित्र चोरावर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजेंद्र गावडे यांनी दिला आहे.


पोलिसांना वेळोवेळी चोरीबाबत माहिती दिली. चोरांवर कारवाई करण्याची मागणी करीत आहोत. मात्र,
योग्य कारवाई होत नसल्याने चोरीचे सत्र थांबत नाही. त्यांचे नुकसान शेतकरी व विद्युत वितरण कंपनीला होत आहे.
- सुमीत जाधव, कार्यकारी अभियंता, महावितरण

रोहित्र चोरी संदर्भात पोलिसाचा तपास सुरू आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. शिरूर तालुक्यात ७४ अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा.
- ज्योतीराम गुंजवटे, पोलिस निरीक्षक, शिरूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com