जांबूतमध्ये पकडला
साडेतीन किलो गांजा

जांबूतमध्ये पकडला साडेतीन किलो गांजा

Published on

टाकळी हाजी, ता. १२ : जांबूत (ता. शिरूर) येथे गांजा विक्री करणाऱ्या समीर हजरतअली शेख (वय ३०) याला शिरूर पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून ३८ हजार ८४० रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त केल्याची माहिती शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, मंगळवारी (ता. ११) शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जांबूत येथे समीर शेख हा त्याच्या घरात गांजाची विक्री करीत आहे. त्याप्रमाणे शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस पथकाने जांबूत येथील आरोपीच्या राहत्या घरी सापळा रचून छापा टाकला. त्या ठिकाणी समीर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ किलो ८४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक करांडे, पोलिस हवालदार भागवत गरकळ, बाळू भवर, पोलिस अंमलदार अंबादास थोरे, भाऊसाहेब ठोसरे यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com