

टाकळी हाजी, ता.३० : शरदवाडी (जांबूत) येथील संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्थेने मीनाशाखा कालव्यावरील पाटबंधारे विभागाकडे सुमारे अडीच लाख रुपयांची पाणी पट्टी एकरकमी जमा केली व आदर्श निर्माण केला आहे.
टाकळी हाजी बेट भागाला कुकडी नदी तसेच मिनाशाखा कालवा यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. मात्र, अनेक शेतकरी कुकडीच्या पाण्यावर लाखो रुपयाचे उत्पन्न घेतात. मात्र, पाणी मागणी अर्ज भरणे तसेच पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे हक्काचे पाणी कुकडी प्रकल्पातील अधिकाऱ्याकडून मागणी करताना पाणी पट्टीच नाही तर पाणी सोडायचे कसे या प्रश्नाला शेतकरी व लोकप्रतिनिधीना उत्तर द्यावे लागते. वेळेत पाणी न आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनी पाणी पट्टी वेळेत भरावा म्हणून माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाणी पट्टी भरा तरचं पाण्यावरचा हक्क राहीन अन्यथा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल असे सांगत सावधानतेचा इशारा दिला होता .
कुकडी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर ,उपविभागीय अभियंता रवींद्र हांडे, शाखाधिकारी अमित कुमावत, मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करीत अभिनंदन केले. पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोरी यांनी सांगितले की, गावातील नादुरुस्त चाऱ्या दुरुस्त करून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येईल . तसेच अनेक चाऱ्या अतिक्रमाने वेढलेल्या असून ते प्रशासन व शेतकऱ्यांच्या मदतीने काढण्यात येईल . .
शरदवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट व सामाजिक जबाबदारी नक्कीच प्रेरणादायी आहे. पाणीपट्टी वेळेत भरल्याने भविष्यातील पाणी टंचाईच्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येईल तसेच अधिकाऱ्यांकडून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी ठोस आधार मिळणार आहे, असे बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी सांगितले.
00514
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.