कर्जाचे हप्ते, उधारी भरायची कुठून?

कर्जाचे हप्ते, उधारी भरायची कुठून?
Published on

टाकळी हाजी, ता. १० : शिरूर तालुक्यात सध्या कांदा काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, बाजारभाव घसरल्याने उत्पादन खर्चही मिळत नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कांदा चाळीत साठवून ठेवण्याशिवाय पर्याय उरला नसून, कर्जाचे हप्ते, दुकानदारांची उधारी भरायची कुठून? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शिरूर तालुक्यामध्ये घोड, कुकडी, वेळ, भीमा या चार नद्याच्या बरोबर चासकमान, डिंभा, मिनाशाखा, घोड कालवे तसेच थिटेवाडी धरण असल्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येथे कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. टाकळी हाजी बेट भागातील जांबुत, पिंपरखेड, कवठे, आमदाबाद, वडनेर आदी भागास कांदा पिकाचे आगारच समजले जाते. प्रत्येक वर्षी हजारो ट्रक कांद्याचे उत्पादन येथे होते. सध्या कांदा काढणीचे कामे वेगाने सुरू आहे. कांदा रोपे ते कांदा काढणीपर्यंत एकरी अंदाजे एक लाख रुपये खर्च होतो. त्यामध्ये मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, कांद्याच बाजारभाव १५ ते १८ रुपयापर्यंत आले आहेत. त्यात हमाली वाहतूक खर्चाची भर पडत आहे. कांदा विक्रीतून पैसे मिळाल्यावर बॅंकाचे कर्ज, मुला मुलीचे लग्न, शिक्षण आरोग्याचा खर्च करू असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोडपणाच्या धोरणाचा फटका कांदा उत्पादकाला बसत आहे. निर्यात शुल्क जरी सरकारने कमी केले तरी सुद्धा बाजारभाव मात्र वाढलेले नाही.
00522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com