अहिल्यादेवींच्या जयंतीचा दिल्लीत होणार सोहळा

अहिल्यादेवींच्या जयंतीचा दिल्लीत होणार सोहळा
Published on

टाकळी हाजी : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ३१) दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमवर सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या सोहळ्याला देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्र येणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची उपस्थिती असणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गेल्या महिन्यापासून अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी (जि. अहिल्यानगर) येथून ‘चोंडी ते दिल्ली स्वराज फेरी’चे आयोजन केले आहे. या फेरीद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याची जनजागृती केली जात असून समाजात त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यात येत आहे. त्याला प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com