महिलेला बसवले जबरदस्तीने वाहनात

महिलेला बसवले
जबरदस्तीने वाहनात
Published on

टाकळी हाजी, ता. ३१ : फाकटे (ता. शिरूर येथे रस्त्याने चाललेल्या महिलेची दिशाभूल करून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रस्त्याने चालली असताना हर्षद ढवळे याने महिलेशी खोटे बोलून तिला मित्रांच्या गाडीत बसवले. त्यानंतर तिला पोलिसांत तक्रार न करण्यासाठी दमदाटीही केली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी हर्षद जालिंदर ढवळे, तसेच त्याचे साथीदार साई ढवळे आणि प्रथमेश ढवळे (सर्व रा. फाकटे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com