पुणे
टाकळी हाजीतील सहा शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती
टाकळी हाजी, ता. २९ : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा शिक्षकांची नुकतीच मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी निवड झाली असून त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत आहे. या निवडीत (जिल्हा परिषद शाळेच्या गावाचे नाव) रंजना गावडे (कवठे येमाई), आशा खोमणे (जांबूत), बाळासाहेब घोडे (पिंपळे खालसा), सुरेश कि-हे ( खैरेनगर) , गणेश काळे (ढोकसांगवी) , शोभा घोडे (वढू) यांचा समावेश आहे. हे सर्व शिक्षक आता आपापल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले आहेत.