तरुणांचे दीपस्तंभ

तरुणांचे दीपस्तंभ

Published on

तरुणांचे दीपस्तंभ

महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही कर्तृत्ववान, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न मौल्यवान रत्ने आहेत, त्यापैकी एक म्हणजे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील. राजकारण आणि समाजकारण यातील चालते-बोलते आदर्श विद्यापीठ म्हणजे वळसे पाटीलसाहेब. राजकारणात काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक तरुणांसाठी ते एक दीपस्तंभ आहेत. त्यांचे बोलणे, वागणे आणि कृतीतून दाखवलेली जनसेवा हे सर्वांसाठी आदर्श ठरली आहे.

-

दिलीपराव वळसे पाटील यांनी गेल्या चार दशकांपासून राज्याच्या विकासाला दिशा आणि गती दिली आहे. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत त्यांनी राज्याच्या जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणात नवा अध्याय सुरू केला. त्यांच्या पुढाकाराने अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन झाली, ज्यामुळे लाखो विद्यार्थी अभियंता बनले. अवसरी (मंचर) येथे उभे केलेले २०० कोटी रुपयांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना
ऊर्जा खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीपराव वळसे पाटील यांनी राज्याला भारनियमनातून मुक्त केले. त्यांनी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांमध्ये विभागणी करून वीज व्यवस्थापनात सुसूत्रता आणली आणि राज्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना राबवून शेतीपंपाच्या बिलांमध्ये सवलत देत दिलासा दिला. अर्थमंत्री असताना त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना मंजूर करून अष्टविनायक महामार्गासारख्या प्रकल्पांना गती दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जिल्हा पातळीवर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गृह खात्याचे मंत्री आणि नंतर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दाखवलेले संतुलन, संयम आणि राज्यहिताचे निर्णय हे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहेत.

सहकार क्षेत्रात अतुलनीय योगदान
सहकार क्षेत्रातही दिलीपराव वळसे पाटील यांनी यांनी योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना राज्यात आणि देशात उत्तम प्रकारे कार्यरत आहे. त्याचबरोबर शरद सहकारी बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, तसेच पराग दूध व पराग शुगर या संस्था शेतकरी सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि ओळख मिळाली आहे.

ग्रामीण रुग्णालयांची उभारणी
आंबेगाव- शिरूर या विस्तीर्ण मतदारसंघात त्यांनी प्रत्येक भागाचा विकास समानतेने साधला आहे. आदिवासी भागात पाच आश्रमशाळा, इंग्रजी माध्यम शाळा, वसतिगृह, पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. श्री क्षेत्र भीमाशंकर, रांजणगाव महागणपती, टाकळी हाजीचे रांजणखळगे, खडकीचा होळकरवाडा या तीर्थ व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर करून पर्यटनाला चालना दिली. मंचरला उपजिल्हा रुग्णालय, तळेघर, पाबळ, मलठण, घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालये उभारली.

पक्क्या रस्त्यांचे जाळे
मतदारसंघातून अष्टविनायक महामार्ग, बेल्हे- जेजुरी रस्ता, शिक्रापूर- मलठण- टाकळी हाजी- वडनेर- जांबूत- पिंपरखेड- मंचर या साठी हजारो कोटी रुपये निधी खर्चून पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले. डिंभे उजवा व डावा कालवा अस्तरीकरण पूर्ण केले, तर दुष्काळी भागाला वरदान ठरणारी कलमोडी उपसा सिंचन योजना आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. वेळ, घोड, कुकडी आणि मीना नदीवरील बंधारे, डिंभे धरणातील बुडीत बंधारे, माळीण पुनर्वसन, तसेच मंचर, निरगुडसर, जातेगाव येथील स्पर्धा परीक्षा केंद्रे, पाबळ येथील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयास मान्यता, वाड्यावरील पक्के रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र, समाजमंदिरे, नळपाणी योजना, क्रीडासंकुल या सर्व कामांनी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे.


अत्यंत शांत, विनम्र पण दृढनिश्चय नेतृत्व असलेले दिलीपराव वळसे पाटील हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राला सजग, पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळाले आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य, नित्य नवचैतन्य लाभो, हीच प्रार्थना.

(शब्दांकन- संजय बारहाते)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com