जांबूतमध्ये घरात घुसून महिलेचे दागिने लांबविले
टाकळी हाजी, ता. २१ : शरदवाडी- जांबूत (ता. शिरूर) येथे भर दुपारी ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून नऊ लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केला. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत याच वस्तीवरील ही दुसरी घटना आहे.
जांबूत-शरदवाडी येथील लहानूबाई सखाराम सरोदे (वय ८५) या शुक्रवारी (ता. २०) घरी एकट्याच होत्या. घरातील मुले व सुना साखरपुडा कार्यक्रमासाठी गेले होते. या वेळी एक अनोळखी व्यक्ती घरी येऊन, ‘आजी, पोरं साखरपुड्याला गेली का?’ असे विचारले. त्यावर आजीने ‘हो’ म्हणताच घरातच पडलेल्या विळ्याने आजीच्या गळ्यातील सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या दागिन्यांची किंमत
अंदाजे ९ लाख रुपये आहे. घटना घडल्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी भेट दिली. दुसऱ्या दिवशी साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, दीड महिन्यापूर्वी येथील सिंधूबाई शांताराम गुजर या महिलेचे संध्याकाळी दागिने ओरबाडले होते. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे चोरांचे धाडस वाढत चालल्याचा आरोप उपसरपंच बाबाजी जोरी यांनी केला. चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने जनता हतबल झाली असून, टाकळी हाजी, कवठे येमाई, आमदाबाद, निमगाव दुडे परिसरातून दहा- बारा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले, पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांचा धाक उरलेला नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागेल, अशी तीव्र भावना जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केली.
याबाबत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले की, पोलिस पथक नेमून तपास चालू असून, चोरांना जेरबंद करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

