जांबूतमधील चोरीमध्ये
पणूतच निघाल चोरटा

जांबूतमधील चोरीमध्ये पणूतच निघाल चोरटा

Published on

टाकळी हाजी, ता. २२ : शरदवाडी- जांबूत (ता. शिरूर) येथे घरात घुसून वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी धाडसी कारवाई करत आजीच्या पणतूलाच अटक केले असून, चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला.
याबाबत साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक करंडे यांनी माहिती दिली की, याप्रकरणी आकाश किसन मेरगळ (रा. पवारवस्ती- जांबूत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता. २०) भर दुपारी शरदवाडी येथे वृद्ध महिला लहानूबाई सखाराम सरोदे या घरी एकट्याच होत्या. घरातील सर्वजण साखरपुडा कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याची माहिती मिळवत त्यांचा पणतू आकाश मेरगळ याने घरात प्रवेश करून साडेसहा तोळे वजनाचे सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पळ काढला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक करंडे, दिलीप पवार, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे एस. एच. चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, भोई, ठोसरे आदी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितापर्यंत धागेदोरे पोहोचवले. आकाश मेरगळ याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com