वडनेर परिसरात गारपिटीने पिके उद्ध्वस्त
टाकळी हाजी, ता. १९ : वडनेर (ता. शिरूर) परिसरात झालेल्या वादळी गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
काढणीला आलेला कांदा आणि डाळिंब बागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
वडनेरसह निमगाव दुडे, फाकटे आणि तामखरवाडी परिसरात सायंकाळी अचानक हवामान बदलून मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे शेतशिवार गारांनी पांढरे झाले होते. काढणीस तयार असलेल्या कांद्याची पात जमिनीवर सपाट झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांमध्ये मोठी फळगळ झाली असून वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर टाकलेली ‘क्रॉप कव्हर’ वाऱ्याने उडून गेली.
वडनेर येथील नाथा भिवसेन निचित यांच्या गोठ्याचे पत्रे उडाले, तर फाकटे येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. चारा पिके आडवी झाल्याने पशुपालकांचेही नुकसान झाले आहे. या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
00897
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

